जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नियोजित विजयादशमी पथसंचलनावरून रविवारी (दि. २५) सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. स. संचलनाच्या मार्गाला विरोध करत रस्त्यावर बसलेल्या आंदोलकांपैकी काहींनी अचानक दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. या दगडफेकीत संघाचे जिल्हा प्रचारक आणि काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे..