उमरखेड : आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाला महावितरणच्या दुर्लक्षामुळे आणखी एक मोठा फटका बसला आहे. उमरखेड शहरापासून अवघ्या दोन. उमरखेड शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नागेशवाडी शेतशिवारात २५ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास विद्युत रोहित्रावर (डीपी) झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उसाच्या शेताला भीषण आग लागली. या आगीत सात शेतकऱ्यांचा सुमारे २५ एकरांतील उभा ऊस जळून खाक झाला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे..