Beed Crime News: मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात हॉटेल मालकासह दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड: बीड तालुक्यातील चौसाळा येथील 'हॉटेल जानकी'चे मॅनेजर सतीश जाधव यांनी हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल मालक आणि त्यांच्या भावाकडून (Beed Crime News) सुरू असलेल्या सततच्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल (Beed Crime News) उचलल्याचे निष्पन्न झाले आहे.