आंदोलकांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष कलिंग मोयोंग आणि आमदारांच्या घरांची तोडफोड केली. दगडफेकीत एका डीएसपीसह अनेक पोलीस जखमी झाले. Arunachal Pradesh Siang Project: प्रस्तावित 11,200 मेगावॅटच्या सियांग प्रकल्पाच्या विरोधात अरुणाचल प्रदेशात हिंसाचार उसळला. जमावाने एनएचपीसी कार्यालय आणि पोलीस ठाण्याला आग लावली. चीनमधून येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवणे आणि पुराचा धोका कमी करणे, हा या प्रस्तावित धरणाचा उद्देश आहे. शुक्रवारी सियांग, अप्पर सियांग आणि पूर्व सियांग जिल्ह्यांमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आला.