३५ हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीरसभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार यांची घोषणापनवेल, ता. २५ (बातमीदार) ः दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पनवेल पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार यांनी ही घोषणा केली. सभागृहाने या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी दिली.