वैजापूर येथे मंगळवारी सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा ! वैजापूर येथे पाणी प्रश्नी उद्या शेतकऱ्यांचा मोर्चा.- आधार शेतकरी जलदूत समितीचा पुढाकार - रब्बीसाठी व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी तीन आवर्तनाची मागणी- वैजापूरच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर देणार धडक .ॲग्रोवन वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगर : रब्बी हंगामासाठी तीन व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी तीन आवर्तनाची मागणी करण्यासाठी वैजापूरच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर लाभधारक शेतकऱ्यांचा मंगळवारी (ता.२७) धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.