जशी खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर एक्सपायरी डेट असते तशी सिमेंटच्या बॅगेवर असते का? खराब झालेले सिमेंट कसे ओळखायचे? जाणून घ्या सोपी पद्धत. स्वतःचे घर बांधणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, घर मजबूत आणि टिकाऊ होण्यासाठी बांधकामात वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः सिमेंट खरेदी करताना त्याची उत्पादन तारीख, साठवणूक आणि गुणवत्ता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. निकृष्ट किंवा ओलावा लागलेल्या सिमेंटमुळे बांधकामाच्या मजबुतीवर परिणाम होऊ शकतो.