नाना पटोले काय माझे मालक आहेत का ? अशी संतप्त प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांना नाना पटोले यांच्यावरुन प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी हे संतप्त उत्तर दिले आहे. अशोक चव्हाण घरवापसी करणार आहेत का? या प्रश्नावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली होती. नाना पटोले म्हणाले होते की, महत्वाच्या काळात अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले होते, त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे.