मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणादरम्यान एका युवकाने मोदी कुठेही जाणार नाहीत असे म्हणत गोंधळ घातला. यावर प्रतिक्रिया देताना खर्गेंनी पंतप्रधान मोदींच्या वडिलांबाबत वादग्रस्त विधान केले. गोंधळ घालणाऱ्या युवकाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचेही समोर आले आहे. एका जाहीर सभेमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. भाषणात एक युवक पंतप्रधान मोदी कुठेही जाणार नाहीत असे सातत्याने ओरडत होता, ज्यामुळे सभेत काही काळ तणाव निर्माण झाला.