Bollywood Actress : बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीनं राजेश खन्ना यांच्यासोबत रोमँटिक सीन्स दिले होते. त्यामुळे ती वादात सापडलेली. त्यानंतर अभिनेत्रीची तिच्या कुटुंबियांसह हत्या करण्यात आली. काही कथा इतक्या भयंकर असतात की, काळाच्या आणि दुःखाच्या ओझ्याखाली दबून त्या आजही आपल्याला सतावत राहतात. अशीच एक कथा आहे बॉलिवूड अभिनेत्री लैला खानची. १९७८ मध्ये रेश्मा पटेल म्हणून जन्मलेल्या लैलानं २००८ साली प्रदर्शित झालेल्या 'वफा: अ डेडली लव्ह स्टोरी' या चित्रपटात राजेश खन्ना यांच्यासोबत काम केलं होतं.