अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना मोठा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्याची आता संपूर्ण जगभरात चर्चा सुरू झाली आहे. फ्रान्समध्ये शिक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, फ्रान्समध्ये सध्या जे आंदोलन सुरू आहे, ते मुळात शिक्षणाच्या मुद्द्यावर सुरूच झालेलं नाही. फ्रान्स आज जळत आहे कारण, त्यांनी आपल्या सीमा अशा लोकांसाठी खुल्या केल्या, जे लोक फ्रान्सचा द्वेष करतात.