जळगाव जिल्ह्यातील यावल येथील किनगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न करण्यात आला. एका गटाने पथसंचालनाला अडवल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी अफवा न पसरवण्याचे आवाहन केले असून, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे यांनी शांततेचे आवाहन केले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या किनगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.