#RahulKardile #Nanded #FarmerNews #ABPMajha #MarathiNews ABP Majha LIVE : नांदेडमध्ये चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मायक्रो फायनान्स आणि फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. जबरदस्तीने वसुली करणे, दमदाटी करणे किंवा धमक्या देणे हा कायद्याने गुन्हा असल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केलं. नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात, त्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.