#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics ABP Majha LIVE : नवी मुंबईतील ज्वेलरी पार्कमुळे एक लाख लोकांना रोजगार मिळणार असून, हा देशातील सर्वात मोठा ज्वेलरी पार्क असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ज्वेलरी निर्यातीच्या क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचंही त्यांनी नमूद केलं. नवी मुंबई विमानतळामुळे होणारं शहरीकरण सुनियोजित पद्धतीने केलं जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. दरम्यान, कर्जतमधील वृक्षतोडीवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना फडणवीस यांनी विरोधकांकडून खोटा नरेटिव्ह पसरवला जात असल्याचा आरोप केला.